खेड मध्ये चिमुरड्यांचा वेशभूषेतून सामाजिक संदेश

 

खेड(प्रतिनिधी) ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मोरवंडे- बोरज येथील ज्ञानदीप बालभवनमध्ये (सीबीएसई) वेशभूषा स्पर्धा पार पडल्या. विद्यार्थ्यांनी वेशभूषेतून पर्यावरण वाचवण्यासह स्वच्छता व वाहतुकीचे नियम पालन करण्यासंदर्भातचा सामाजिक संदेश दिला.

बालभवनमधील चिमुरड्यांनी झाशीची राणी, छत्रपती शिवाजी महाराज, आधारकार्ड, को-वॅक्सिन, नारळ, झाडे जगवा – झाडे वाचवा, पाणी वाचवा, स्वच्छतेविषयी महत्व सांगणारे पर्यावरणविषयक संदेश, वाहतुकीचे नियम, स्वच्छ भारत, पोतदार, मावळे यासारखे सामाजिक संदेश देणारे पोषाख परिधान करत लक्ष वेधले.

नर्सरीतून तन्मय घोसाळकर, शौर्य घोसाळकर, अद्विका खेराडे, त्रिवेद सापटे यांनी तर लहान गटातून शिवांश आंब्रे, श्रुत्व चांदिवडे, रिया गुंदेकर, बालभवन व गटातून रेयांश नाईक, जिज्ञासा शेळके, क्रिश रेडिज यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळवले.

मोठ्या गटातून ईश्वरी गुंदेकर, अथर्व कारगी, महिरा खेराडे तर बालभवन तीन गटातून स्मृती मुंढे, अंश शेठ, रिहांश मटकर, मिरा पवार यांनी पहिले तीन क्रमांक मिळवले.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जयश्री शिरसाट, जान्हवी पाटील, कस्तुरी चोनकर, आशा शिगवण यांनी प्रयत्न केले. प्राचार्य भरत मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी यांच्यासह संस्था पदाधिकाऱ्यांनी उपक्रमाचे कौतुक केले.