गुहागर तालुका तेली समाजाच्या वतीने आयोजन; तेली ज्ञाती बांधव अडूर यांच्या वार्षिक कार्यक्रमाचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष
अडूर | वार्ताहर : तेली समाजाचे आराध्य दैवत व जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या मूळ गाथेचे लेखनकर्ते राष्ट्रसंत श्री.संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०० व्या पुण्यतिथी वर्षपूर्तीचे औचित्य साधून गुहागर तालुका तेली समाजाच्या वतीने तालुकास्तरीय गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याचबरोबर तेली समाजातील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा’ हा उपक्रम सुद्धा राबविण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम रविवार, दिनांक ०१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता श्री.विठ्ठलाईदेवी मंदिर, अडूर (धारेचा वड– तेलीवाडी) याठिकाणी संपन्न होईल. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन तेली ज्ञाती बांधव अडूर यांच्या वतीने करण्यात येणार आहे.
तेली ज्ञाती बांधव अडूर यांच्या वार्षिक कार्यक्रमाचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रम भरगच्च कार्यक्रमामुळे नियोजित वेळेत चालू करण्यात येणार असल्याने सर्व समाज बांधवांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन गुहागर तालुका तेली समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.










