खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील देवघर – सोडे ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा ५० अभियानांतर्गत ग्रामस्थांना शेवग्याच्या लागवडीबाबत केलेल्या मार्गदर्शनानंतर ग्रामस्थांनी शेवग्याची लागवड करण्यास सुरूवात केली आहे. ग्रामपंचायतीच्या आवाहनाला ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद देण्याची भूमिका घेतली आहे. याद्वारे ग्रामस्थांचा आर्थिक उत्कर्ष साधण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे सरपंच सुनील मोरे यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत काही दिवसांपूर्वीच ग्रामस्थांना बांबू, शेवगा व खस लागवडीबाबत मार्गदर्शन केले होते. ग्रामस्थांनी शेवग्याची लागवड करत ग्रामपंचायतीच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. सरपंच सुनील मोरे, उपसरपंच नामदेव सोंडकर, ग्रामसेवक दीपक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या सहयोगातून ग्रामस्थांनी शेवग्याची लागवड केली. आर्थिक उत्कर्ष साधण्याच्या दृष्टीने ग्रामस्थांना अत्यावश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे ग्रामसेवक दीपक कदम यांनी सांगितले.











