
सरपंच महेश बाष्टे यांचा इशारा
माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील आरवली – माखजन मार्गावर दर अर्ध्या तासाने सुटणाऱ्या आरवली- माखजन,व माखजन – आरवली बसफेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत.याचा फटका प्रवाशांना बसला आहे.देवरुख आगाराने या बसफेऱ्या तात्काळ सुरू कराव्यात अशी मागणी महेश बाष्टे यांनी केली आहे.या फेऱ्या तात्काळ न सुरू झाल्यास माखजन बसस्थानकात उग्र आंदोलन छेडू असा इशारा माखजन चे सरपंच महेश बाष्टे यांनी दिला आहे.
देवरुख आगाराकडे सातत्याने पाठपुरावा करून देखील माखजन आरवली बसफेऱ्या पूर्वी प्रमाणे कार्यान्वित केल्या जात नसल्याने आंदोलनाचे हत्यार उसपावे लागत असल्याचे महेश बाष्टे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
देवरुख आगाराकडून माखजन बसस्थानाकातील अनेक मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.माखजन बसस्थानाकातून रत्नागिरी ला जाणाऱ्या सर्व बससेवा बंद करण्यात आल्या आहेत.त्या पुन्हा पूर्ववत कराव्यात अशी मागणी सर्व स्तरातून होत असताना देखील याकडे देवरुख आगराने दुर्लक्ष केले आहे.या साऱ्याच फटका आबाल वृद्धांसह,पेशंट ना सहन करावा लागत आहे.’प्रवाशांच्या सेवेसाठी’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या देवरुख आगारात मात्र सेवेची अनास्था दिसत आहे.माखजन बसस्थानक म्हणजे सध्या गैरसोयीचे आगार असल्याचे चित्र आहे.पूर्वी च्या मुंबई,कोल्हापूर,रत्नागिरी गाड्या कायम चालू ठेवण्यात देखील देवरुख आगाराला सपशेल अपयश आले आहे.भारमान असून देखील आरवली माखजन बस फेऱ्या बंद केल्याने प्रवाशांना उन्हातान्हातून दोन दोन तीन तीन तास ताटकळत उभे राहावे लागत आहे.
आरवली माखजन मार्गावर बसफेऱ्या तात्काळ चालू न झाल्यास माखजन बस स्थानकात सर्वपक्षीय तीव्र आंदोलन करू असा इशारा महेश बाष्टे यांनी दिला आहे












