लांजा येथे काजू प्रक्रियेवर आधारित तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

 

लांजा (प्रतिनिधी) लांजा येथील कल्पना कॉलेज येथे डिसेंबर महिन्यात काजू प्रक्रियेवर आधारित तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे (SARTHI) पुरस्कृत , महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आयोजित महाराणी सईबाई सारथी महिला आर्थिक सक्षमीकरण योजनेअंतर्गत १५ दिवसांचे कालावधीत लांजा येथे काजू प्रक्रियेवर आधारित तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे
सदर प्रशिक्षणामध्ये सारथीच्या लक्षित गटातील (मराठा ,कुणबी, कुणबी – मराठा व मराठा -कुणबी) या उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ इच्छिणारा लाभार्थी हा ८ वी पास आणि १८ते ४५ वर्षे वयोगटातील असावा.महाराष्ट्र राज्याचा रहिवासी व स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असणारा असावा.

 

शैक्षणिक पात्रतेसह रहिवासी प्रमाणपत्र , जातीचा दाखला , आधार कार्ड व उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक असून अधिक माहितीसाठी 7377177191 या क्रमांकावर कार्यक्रम समन्वयक महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा हॉटेल मॅनेजमेंट कल्पना कॉलेज येथे १२ डिसेंबर पर्यंत संपर्क साधायचा आहे.