२ डिसेंबर पासून कोल्हापूर ला उच्च माध्यमिक ची संच मान्यता

 

माखजन | वार्ताहर : कोल्हापूर उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या उच्च माध्यमिक शाळांमधील १४/१०/२०२४ च्या शासन निर्णयानुसार २०% वेतन अनुदानावरून ४०% व ४०%वेतन अनुदानांवरून ६०% वेतन अनुदानास पात्र घोषित झालेल्या उच्च माध्यमिक शाळांची सॅन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षकरिता होणारी संच मान्यता २ डिसेंबर पासून होणार आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग ची २ डिसेंबर,३ रोजी कोल्हापूर,४ सांगली,५ ला सातारा तर ६ रोजी काही कारणाने राहिलेल्या पाचही जिल्ह्यातील उच्चमाध्यमिक शाळांची संच मान्यता होणार आहे.

 

 

संबंधित शाळांना १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार १ जून २०२४ पासून वेतन अनुदानाचा पुढील लागू करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर ही संचमान्यता होत आहे.कोल्हापूर चे शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी याविषयीचे परिपत्रक काढले आहे.
परिपत्रकात म्हटल्याप्रमाणे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी होणारी संच मान्यता ही ३० सप्टेंबर २०२४ ची विद्यार्थी संख्या विचारात घेऊन ज्या विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक पडताळणी झाले आहेत अशाच विद्यार्थ्यांना ग्राह्य धरले जाणार आहे.
सोबतच टप्पा वाढीच्या दृष्टीने काही महत्वाची कागदपत्रे असलेली फाईल जमा करण्याच्या सूचना या परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.
सदरील संच मान्यता ही दिलेल्या तारखांना विभागीय महाराष्ट्र राज्य माध्यमिक,उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर ,राजेंद्रनगर येथे होणार आहे.
उपरोक्त तारखांना संबंधित जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी संच मान्यतेला उपस्थित राहावे असे आदेश देण्यात आले आहेत