जुन्या आणि नव्याने भात खरेदी केंद्रांना मंजुरी मिळावी  

 

सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची घेतली भेट

कणकवली;२०२४-२०२५ मध्ये होणाऱ्या धान (भात) खरेदीसाठी जिल्ह्यात २०२३-२०२४ ला मंजूर असलेली धान (भात) खरेदी केंद्रे व नव्याने जिल्ह्यातील काही विविध कार्यकारी संस्था यांच्या मागणीनुसार धान (भात) खरेदी केंद्रांना मंजुरी मिळावी. अशी मागणी सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे यांच्या शिष्टमंडळाने केली.जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट घेवून निवेदन दिले.

शेतकऱ्यांचे ज्या ठिकाणी उत्पादीत होणाऱ्या धान ची (भात ची) विक्रीची सोय होईल व शेतकऱ्यांना विक्री करताना जवळ केंद्र असल्याने लाभ होऊन हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना लगाम बसून शेतकऱ्यांना हमीभाव चा फायदा होईल.त्यासाठी सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे व मा.संचालक आनंद ठाकूर,प्रदीप मांजरेकर व दिलीप तवटे यांनी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना निवेदन सादर केले.

सदर धान (भात) खरेदी केंद्रे पूर्वी मंजूर असलेली व नव्याने मागणी केलेली केंद्रे मंजूर करून त्यांना कोड नंबर तात्काळ मिळून देऊन चार दिवसात धान (भात) खरेदी केंद्रे सुरू करावी व शेतकऱ्यांना आपले धान (भात) विक्री करण्यासाठी जवळच्या केंद्रावर सोय होण्यासाठी मा.जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना निवेदन सादर केले.