
अन्य दुचाकी वरील तिघे जखमी
खेड (प्रतिनिधी)मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे- गवळवाडी येथील माऊली गॅरेजसमोर खासगी आराम बस व दोन दुचाकी यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर अन्य दुचाकी वरील तिघे जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास झाला
मुबीन हुसेन नाडकर (वय-२८ , रा. संगलट मोहल्ला, ता. खेड) असे जागीच ठार झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे तर, रविंद्र सुरेश सुतार (वय-३३), सांची रविंद्र सुतार (७) व राहुल संतोष सुतार (तिघेही रा. कळंबणी, ता. खेड) अशी अन्य जखमी झालेल्यांची नावे आहेत.
भरणे-गवळवाडी येथे मुंबईच्या दिशेने जात असलेल्या खासगी आसमबस बस क्रमांक- एम. एच. ०६ एस. ९७३१ या वरील चालकाने स्कुटर प्लेझर गाडी क्रमांक एम. एच. ०८ ए.के. २९३३ या गाडीला पाठी मागून धडक दिली असता या स्कूटीने दुसऱ्या स्कुटी क्रमांक. एम. एच.०८ ए.एस. ९२४१ ला धडक दिल्याने तिहेरी अपघात झाला
स्कुटरी प्लेझर गाडी क्रमांक एम. एच. ०८ ए. के. २९३३ चा स्वार मुबीन नाडकर हा जागीच ठार झाला. तर दुसऱ्या स्कुटीवरील तिघे जखमी झाले. अपघात झाल्यानंतर परिसरात मोठी गर्दी जमली. खेड पोलीसांनी देखील घटनास्थळी धाव घेत पंचनाम्याला सुरुवात केली. भरणे नाका ब्रिजखाली उभ्या असणाऱ्या नाणीजधाम येथील श्री जगद्गुरु महाराज संस्थानच्या २४ तास मोफत असणाऱ्या रुग्णवाहिकेतून मयत दुचाकीस्वाराला शवविच्छेदनासाठी तर जखमींना प्राथमिक उपचारासाठी जवळील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. अधिक तपास येथील पोलीस करीत आहेत.












