इन्सुली क्षेत्रफळवाडी येथे आठफुटी मगर जेरबंद

सावंतवाडी । प्रतिनिधी : इन्सुली क्षेत्रफळवाडी येथील अमोल डुगल यांच्या घराशेजारी आलेली आठ फूट मगर रात्री साडेबारा वाजता वनविभागाच्या
जलद कृती दलाने जेरबंद केली.

 

 

त्यानंतर तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
इन्सुली क्षेत्रफळवाडी येथे अमोल डुगल यांच्या घराशेजारी भर वस्तीमध्ये आठ फुट लांबीची भली मोठी मगर मध्यरात्री १२.३० च्या सुमारास आढळून आली. स्थानिक लोकांनी वनविभागाला याबाबत माहिती दिल्यानंतर वनविभागाच्या जलद कृती दलाने घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. त्यानंतर जलद कृती दलाचे पथक प्रमुख बबन रेडकर व त्यांचे सहकारी यांनी मगरीला जेरबंद करून त्या मगरीला नैसर्गिक अधिवासात सुखरूप पणे मुक्त केले.