कॉलेजयुवकाची गळफास घेवून आत्महत्या
तोरसोळे येथील घटना
देवगड : प्रतिनिधी
देवगड येथील केळकर महाविद्यालयात शिकत असलेल्या साईल किशोर पवार(१८) रा.तोरसोळे गावकरवाडी या कॉलेज युवकांने घराच्या टेरेसवरील लोखंडी बाराला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.ही घटना १ डिसेंबर रोजी रात्री १० वा.सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, साईल हा तोरसोळे गावकरवाडी येथे राहत होता.देवगड येथील स.ह.केळकर महाविद्यालयात तो शिकत होता.तो राहत असलेल्या घराच्या एका भागात अरqवद रामचंद्र पवार त्यांची पत्नी व मुलगी राहत असून दुसèया भागात साईल, त्याची आई कामीनी किशोर पवार व चुलती वनमाला पवार अशी तिघेजण एकत्रित कुटूंबात राहत होती.साईल याची मोठी बहिण प्रतिमा ही विवाहीत असून कोल्हापूर येथे राहते तर भाऊ कार्तिक हा कामानिमित्त मुंबईत राहतो.१ डिसेंबर रोजी अरqवद पवार हे घरात रात्री १० वा.सुमारास जेवण आटोपून बसलेले असताना त्यांना दुसèया भागात राहणाèया कामीनी पवार यांच्या घराच्या टेरेसवरून जोरजोरात रडण्या ओरडण्याचा आवाज आला.त्यांनी तात्काळ टेरेसवर जावून पाहिले असता साईल हा टेरेसच्या लोखंडी बाराला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावलेला स्थितीत दिसला.या घटनेनंतर माहिती समजताच गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.याबाबतची खबर देवगड पोलिस स्टेशनला अरqवद रामचंद्र पवार यांनी खबर दिली.पोलिसांनी आकस्मिक मृत्यु म्हणून नोंद केली असून तपास म.पो.हे.कॉ.अमृता बोराडे करीत आहेत.












