देवगड / प्रतिनिधी :देवगड बाजारपेठ येथील ज्येष्ठ व्यापारी चंद्रकांत सदाशिव मोर्ये (७४) यांचे रविवारी पहाटे ३.३० वा. च्या सुमारास राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. ‘आप्पा’ या नावाने ते सुपरिचित होते. पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना असा परिवार आहे. देवगड गोडाऊननजीकचे श्री स्वामी समर्थ जनरल स्टोअर्सचे मालक हरेश उर्फ बंडू मोर्ये यांचे ते वडील होत. देवगड बाजारपेठमधील यशोदा हॉटेलनजीक त्यांनी सुमारे ३० वर्षे खाण्याच्या पानाचा व्यवसाय केला होता.











