रोटरी क्लब ऑफ माहीम मुंबई च्या वतीने चौके हायस्कूल येथे कौशल्य आधारित अभ्यासक्रम चर्चासत्र संपन्न…

चौके – प्रतिनिधी :-रोटरी क्लब ऑफ माहीम मुंबई यांच्या वतीने भ.ता.चव्हाण,महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके या ठिकाणी कौशल्य आधारित अभ्यासक्रम काळाची गरज या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी माहीम रोटरीच्या अध्यक्षा सौ.विदुला क्षीरसागर मॅडम,भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.प्रसाद देवधर,कॉझ टू कनेक्ट संस्थेचे संस्थापक श्री.अनिरुद्ध बनसोड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रोटरी क्लब ऑफ माहीम व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भ.ता.चव्हाण,महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके या प्रशालेत कौशल्य आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे. या अनुषंगाने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. माहीम रोटरी च्या अध्यक्षा सौ विदुला क्षीरसागर मॅडम यांनी आपण दिलेल्या मदतीचा उपयोग होत असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले. कला ही मानवाला जगायला शिकवते त्यामुळे कोणती तरी कला व्यक्तीच्या ठाई असणे आवश्यक आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी श्री अनिरुद्ध बनसोड सर यांनी ग्रामीण भागातील मुलांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रात्यक्षिक ज्ञानही मिळालं पाहिजे हा विचार मनात ठेवून पण सदर उपक्रम सुरू केला असे मत मांडले विद्यार्थ्यां जवळ एखादी कला असेल तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो विद्यार्थी मुंबई पुणे यासारख्या शहराकडे न वळता गावातच राहून एखादा उद्योग सुरू करू शकतो व त्यासाठी आपले सहकार्य राहील अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री डॉक्टर प्रसाद देवधर यांनी सदर उपक्रमाचे कौतुक करताना शाश्वत विकासाच्या दृष्टीने पण सर्वांनी मिळून या उपक्रमाचा रथ पुढे नेऊया असे आवाहन केले. यावेळी त्यांनी भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान कडून गायीच्या शेणापासून आणि माती पासून मिश्रणातून बनविलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती या उपक्रमाची ही माहिती दिली.सदर कार्यक्रमाच्या वेळी सर्व पाहुण्यांना त्याचप्रमाणे सर्व प्रशालेतील विद्यार्थ्यांना स्किल ऑन व्हील उपक्रमांतर्गत कौशल्य आधारित उपक्रमांची माहिती देण्यात आली. यावेळी माहीम रोटरी क्लबच्या सचिव सौ शैला रेगे, खजिनदार श्री किशोर परुळेकर,माजी अध्यक्षा सौ. संध्या समुद्र,माहीम रोटरी क्लब च्या सर्व सदस्या,बॅरिस्टर नाथ पै सेवांगणचे कार्याध्यक्ष श्री दीपक भोगटे,कॉझ टू कनेक्ट च्या सन्माननीय दिपाली खरमोळे मॅडम,चौके हायस्कूल स्थानिक समितीचे अध्यक्ष श्री.बिजेंद्र गावडे,रुबु बायोलॉजीक्स USA चे फाउंडर डॉ. सुरेंद्र चव्हाण,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.रसिका गोसावी मॅडम,पत्रकार समितीचे अध्यक्ष श्री.संतोष गावडे, प्रहार चे पत्रकार श्री.नितीन गावडे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री.शामसुंदर मेस्त्री,पालक महेश सावंत आदी उपस्थित होत. चर्चासत्राचे सूत्रसंचालन माहीम रोटरी क्लबच्या सदस्या सौ रश्मी पाटील मॅडम यांनी केले. स्थानिक समितीचे अध्यक्ष श्री.बिजेंद्र गावडे यांनी सर्वांचे आभार मानले.