फटाक्यांची आतषबाजी करत नागरिकांना केले लाडू वाटप
वेंगुर्ले : दाजी नाईक
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी भाजपाचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी शपथ घेताच वेंगुर्ले येथे भाजपा कार्यालयासमोर भाजप युवा मोर्चा च्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करत सर्वांना लाडू वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी युवामोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, युवामोर्चा सरचिटणीस वैभव होडावडेकर, युवामोर्चा उपाध्यक्ष संकेत धुरी, युवा मोर्चा उपाध्यक्ष पिंट्या सावंत, युवामोर्चा चिटणीस रवी धोंड, युवामोर्चा चिटणीस दशरथ गडेकर, शिरोडा शहरध्यक्ष सोमा सावंत, युवामोर्चा जिल्हाउपाध्यक्ष भूषण आंगचेकर, हितेश धुरी, तेजस कुंभार, प्रवीण गडेकर, विश्राम धुरी, सरपंच संघटना अध्यक्ष पप्पू परब, अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील, मनवेल फर्नांडिस, वसंत तांडेल, आबा येरम, संदीप देसाई, बिटू गावडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.












