हृदयविकाराच्या झटक्याने झाले निधन
कणकवली : कणकवलीतील एस एस पी एम इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.अनिश चिंतामण गांगल वय (४९) यांचे आज सोमवार ८ मे रोजी दुपारी १.३० हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. डॉ. गांगल हे खेड येथे आपल्या गावी गेले होते. तिथे त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्य मुळे मुंबई येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचे आज निधन झाले. गेली पाच वर्ष एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून ते कार्यरत होते.












