मंडणगड l प्रतिनिधी – मंडणगड शहरातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील बांधवाना पक्के आणि सुरक्षित घर बांधण्यासाठी मंडणगड शहरांत संधी उपलब्ध झाले आहे. शहरी रमाई आवास योजनेंतर्गत पक्के घर बांधण्यासाठी अडीच लाख रुपये अनुदान आहे त्यामुळे या समाज घटकातील व्यक्तींनी पक्के घर बांधण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा असे अवाहन न मंडणगड नगरपंच्यायतीचे मुक्याधीकारी श्री. अभिजीत कुंभार यांनी केले आहे. मंडणगड शहरातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील बहुसंख्य समाज बांधवाना सुरक्षित निवारा नाही अशा समाज बांधवाना पक्के घर बांधून घेण्याची संधी उपलब्ध झाले आहे. रमाई आवास योजनेंतर्गत या संधीचा लाभ घेण्याचे अवाहन नगरपंचायत मुक्याधिकाऱ्यांनी केले आहे.मंदिरासह घरादारांचे दरवाजाही झाले बंद
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला, उत्त्पन्नाचा दाखला, ओळखपत्र, मालकी हक्काची कागदपत्रे, सहहिस्सेदाऱ्यांची संमतीपत्रासह नोंदणीकृत अभियंत्यामार्फत परवानगी आवश्यक असल्याचे मुख्याधिकारी श्री. अभिजीत कुंभार यांनी सांगितले.












