राज्याला सिंधुदुर्ग मधून नितेश राणे यांच्या रूपाने नवे नेतृत्व मिळाले! जिल्ह्याला मंत्रिपदाचा बहुमान

 

नितेश राणे घेणार मंत्रीपदाची शपथ

भाजप, सेना व राष्ट्रवादी पक्षाच्या मंत्र्यांची यादी निश्चित

सिंधूनगरी | प्रतिनिधी : देशासाठी हिंदुत्वाची गरज आणि भारतीय जनता पक्षाचा झेंडा खांद्यावर घेत गेले तीन टर्म आमदार असलेले सिंधुदुर्गच्या सुपुत्र नितेश राणे यांनी आपल्या मेहनतीने व कर्तबगारितून या जिल्ह्याचे व राज्याचे नेतेपद सिद्ध केले आहे. भाजपा महायुतीच्या सत्तेत एक मंत्री म्हणून त्यांना दिलेली जबाबदारी भारतीय जनता पक्षासाठीही फार मोठी देणगी ठरली आहे. महाराष्ट्रासाठी आणि सिंधुदुर्गसाठी विकासाचे व्हिजन असलेले युवा पिढीतील एक नवे नेतृत्व मिळाले आहे. अनेक पक्षांच्या समीकरणांमध्ये नेते पदाची संधी मिळणे फार अवघड असते. पक्ष, हिंदुत्व, प्रामाणिकपणा आणि पक्ष संघटनेसाठी घेतलेले मेहनत यामुळेच आम नितेश राणे यांना मिळालेली संधी भाजपासाठी ही वरदान ठरणारी आहे.

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून ३७ आमदारांना मंत्रि‍पदासाठी फोन करण्यात आले आहेत. त्यामध्ये भाजपचे १९ , शिंदे शिवसेनेचे ११ व अजित पवार राष्ट्रवादीचे ७ मंत्र्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते.
ती संपूर्ण यादी –
भाजप- 19 मंत्री
1. नितेश राणे
2. शिवेंद्रराजे भोसले
3. चंद्रकांत पाटील
4. पंकज भोयर
5. मंगलप्रभात लोढा
6. गिरीश महाजन
7. जयकुमार रावल
8. पंकजा मुंडे
9. राधाकृष्ण विखे पाटील
10. गणेश नाईक
11. मेघना बोर्डीकर
12. अतुल सावे
13. जयकुमार गोरे
14. माधुरी मिसाळ
15. चंद्रशेखर बावनकुळे
16. संजय सावकारे
17. अशोक उईके
18. आकाश फुंडकर
19. आशिष शेलार
शिवसेना -11
1. उदय सांमत
2. प्रताप सरनाईक
3. शंभूराज देसाई
4. योगश कदम
5. आशिष जैस्वाल
6. भरत गोगावले
7. प्रकाश आबिटकर
8. दादा भूसे
9. गुलाबराव पाटील
10. संजय राठोड
11. संजय शिरसाट
राष्ट्रवादी -7
1. आदिती तटकरे
2. बाबासाहेब पाटील
3. दत्ता मामा भरणे
4. हसन मुश्रीफ
5. नरहरी झिरवाळ
6. मकरंद पाटील
7. इंद्रनील नाईक
या तिन्ही पक्षाच्या यादीनुसार या नेतृत्वाना राज्याच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे.