धामणंद मधील बीएसएनएल टॉवर ची रेंज गायब ग्राहक ‘आऊट ऑफ कव्हरेज’

 

खेड | प्रतिनिधी : खेड तालुक्यातील धामणंद मुलांडावाडी येथील बीएसएनएल टॉवर ची गेल्या २० दिवसापासून रेंज च गायब झाल्याने येथील ग्राहक आउट ऑफ कव्हरेज झाले आहेत या समस्येवर संबंधित प्रशासना कडून अद्यापि कोणतीच उपाययोजना केली गेली नसल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले

धामनंद हा परिसर बीएसएनएल ने जोडला गेला आहे या परिसरात खासगी मोबाईल सेवा नसल्याने ग्राहकांची सर्वच मदार बीएसएनएल सेवेवर आहे मात्र गेल्या २० दिवसा हुन अधिक सेवा कोलमडून पडली असल्यानें या परिसरात संपर्क साधण्यात मोठ्या अडथळयाची शर्यत पार करावी लागत आहे या परिसरात अनेक जण भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत ते देखील आपल्या कुटुंबाशी संपर्क साधत असतात मात्र त्यांना देखील आऊट ऑफ कव्हरेज चा सामना करावा लागत असून येथील टॉवर मात्र शोभेचे बाहुले झाला आहे

या परिसरात टॉवर कार्यान्वित झाल्या पासून ही समस्या कायम आहे मात्र यावर ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही अचानक विद्युत पुरवठा खनडीत झाल्यास इथे ह्या टॉवरला डिझेल जनरेटर किंवा बॅटरीची व्यवस्था देखील नसल्याची बाब उघड झाली आहे. दरम्यान या टॉवर च्या संपर्कात मुसाड. कुंभवली. धामणंद मुलांडा वाडी मुसाड पेठ. कुरवळ जावली कुरवळखेड. निंबारावाडी कुंभारवाडा वावे. पोसरे आदी गावे येत आहेत मात्र या गावातील ग्राहक आउट ऑफ कव्हरेज झाले आहेत

याबाबत येथील माजी सैनिक बाळकृष्ण श्रीरंग सुर्वे, मुसाड यांनी वारंवार संबंधित यंत्रणा तसेच वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करून सेवा सुधारण्यासाठी विनंती केली होती मात्र त्याची दखल देखील यंत्रणेनी घेतलेली नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे