खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील चिंचघर रेवेचीवाडी येथे १३ रोजी सायंकाळी ५.२० वाजण्याच्या सुमारास दारूबंदीची कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी एका कडून ३० लिटर गावठी हातभट्टीची दारू विक्री करताना रंगेहाथ पकडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड पोलिस ठाण्यातील पोकॉ ६६ कृष्णा सदाशिव बांगर यांनी विजय वामन जाधव याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी यांना गुप्त माहिती मिळाली होती की, विजय जाधव हा चिंचघर रेवेचीवाडी येथे बेकायदेशीरपणे दारू विक्री करत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून विजय जाधवला रंगेहाथ पकडले.










