ना. सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त तोणदे येथे ग्रामस्थांची डोळे तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबीर संपन्न

 

युवासेना शाखा तोणदे व इन्फिगो आय केअरचा उपक्रम

 

राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवासेना शाखा तोणदे आणि इन्फिगो आय केअर हॉस्पीटलच्या संयुक्त विद्यमाने तोणदे येथे मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी गावातील सव्वादोनशेहून अधिक महिला व पुरुष ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेत, मंत्री सामंत यांना धन्यवाद दिले.

नव्या मंत्रिमंडळात उदय सामंत यांच्यावर पुन्हा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी उद्योग विभागाची जबाबदारी दिली आहे. मराठी राज्य भाषा होण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे मराठी भाषा विषयही ना. सामंत यांना देण्यात आला. ना. सामंत यांना मिळालेल्या या पदामुळे जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ना. सामंतांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष युवा सेना विविध उपक्रम राबवत आहे. गुरुवार 26 डिसेंबर रोजी ना. सामंत यांचा वाढदिवस असून, युवासेना शाखा तोणदेआणि इन्फिगो आय केअर हॉस्पीटलच्या माध्यमातून गावातील परिसरातील अन्य ग्रामस्थांच्या डोळ्यांची मोफत तपासणी आणि मोफत चष्मा वाटप कार्यक्रम मंगळवार 24 रोजी आयोजित करण्यात आले होते. युवासेना तोणदे शाखेच्यावतीने राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत असून ग्रामस्थांनी या शिबिराला भरभरुन प्रतिसाद दिला आहे.

या शिबिराला उपस्थित महिला तालुकाप्रमुख सौ. कांचन नागवेकर, युवासेना तालुकाप्रमुख तुषार साळवी, युवा विभागप्रमुग प्रशांत जांगळी, तोणदे ग्रा.पं. सरपंच शीला जाधव, उपसरपंच वैभव चव्हाण, माजी सरपंच महेश महाकाळ, तंटामुक्त अध्यक्ष संजय पुसाळकर, ग्रा.पं. सदस्य धर्मेंद्र जाधव, उद्योजक बंधू नागवेकर, अरुण गोरे, प्रकाश लिमये, प्रकाश गुरव, महेश भाटकर, पोलीस पाटील बंटी सुर्वे आदी मान्यवरांसह इन्फिगोचे पथक उपस्थित होते. या शिबिराचा लाभ महिला व पुरुष अशा 230 ग्रामस्थांनी घेतला. ना. सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त राबवलेला हा उपक्रम यशस्वी करणार्‍या युवासेना शाखाप्रमुख शुभम महाकाळ, स्वरुप पेटकर, सौरभ तोडणकर, आदेश पोवार, निखिल भोवड व त्यांच्या सहकार्‍यांचे युवा तालुकाप्रमुख तुषार साळवी यांनी कौतुक केले.