२९ रोजी माखजनात मोफत नेत्र तपासणी

 

माखजन | वार्ताहर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि वाशिष्ठी दूध डेअरी चे चेअरमन प्रशांत यादव यांच्या वाढदिवसानिमित्त संगमेश्वर तालुक्यातील माखजन मध्ये मोफत नेत्र तपासणी शिबीर होणार आहे.
प्रशांत यादव मित्रमंडळ व चिपळुणातील कुलकर्णी नेत्र रुग्णालय यांचे वतीने हे शिबीर २९ रोजी माखजन प्राथमिक आरोग्य केंद्रात होणार आहे.

 

 

सकाळी १० ते ५ या वेळेत हे शिबीर होईल.मोफत नेत्र तपासणी झाल्यावर फक्त काचेचे पैसे आकारले जाणार आहेत तर चष्म्याची फ्रेम न्यू ऑप्टिकल शॉप मिरज यांचे वतीने मोफत देण्यात येणार आहे.
अधिक माहिती साठी ९३०९०१६००९ वर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.