खेड मध्ये ७ ते १२ जानेवारी जेसी फेस्टिवल ची धूम

खेड(प्रतिनिधी) येथील जेसी आय खेड आयोजित २२ वा जेसी फेस्टिवल चे आयोजन महाड नाका येथे आयोजित  करण्यात आला असून  जेसी फेस्टिवलची सुरवात जेसी कारनिवलने  करण्यात येणार आहे .
 या फेस्टिव्हलचे उद्घाटन गृहराज्यमंत्री नामदार . योगेशदादा कदम यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत . वेगवेगळे स्टॉल , खाद्यनगरी , आनंदमेळा, सांस्कृतिक कार्यक्रम , दांडिया नाईट, खेळ पैठणीचा , परदेशी कलाकार यांचे चित्तथरारक अनुभव कलेचे सादरीकरण, अभिनेत्री यांची फेस्टिवल मधे उपस्थिती , लावणी , असे वेगवेगळे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत . त्याचं बरोबर गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना सायकल वाटप , गरजू महिलांना शिलाई मशीन , घरघटी यांचे वाटप उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे .
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यक्रम प्रमुख जेसी प्रमोद कांबळे , अध्यक्ष जेसी अमर दळवी व जेसी आय खेड चे सर्व सभासद प्रयत्न करत आहेत .