लांजा (प्रतिनिधी)नासा- इस्रो निवड चाचणी परीक्षेत वनगुळे शाळा नं.1 च्या मनस्वी गुरव व सुचित तावडे यांची तालुकास्तरावर निवड झाली आहे.
सदर निवड चाचणी नुकतीच पार पडली. यामध्ये तालुका स्तरावरील परीक्षेत वनगुळे शाळा नं.1 च्या कुमारी मनस्वी प्रभाकर गुरव हिने प्रथम क्रमांक तर कुमार सुचित दिलीप तावडे यांनी चौथा क्रमांक मिळवून जिल्हास्तरावर मुलाखतीसाठी त्यांची निवड लांजा तालुक्यात झालेली आहे
रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, विज्ञानाची जाण व्हावी या उद्देशाने इस्रो निवड चाचणीचा उपक्रम घेतला जातो. नुकत्याच लांजा तालुकास्तरीय घेण्यात आलेल्या नासा, इस्रो निवड चाचणी परीक्षेत वनगुळे शाळेने सुयश संपादन केले आहे. याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे












