इस्रो नासा परीक्षेत स्वरा लांजेकर चे यश

शृंगारतळी (वार्ताहर) रत्नागिरी जिल्हा परिषद आयोजित इस्रो, नासा अंतराळ संशोधन भेटीसाठी घेण्यात येणाऱ्या जिल्हा स्तर चाळणी परीक्षेसाठी जिल्हा परिषद शाळा मुंढर नं. १ ची विद्यार्थिनी कुमारी स्वरा संतोष लांजेकर ही पात्र ठरली. त्या निमित्ताने शाळा व्यवस्थापन समिती च्या सभेत अध्यक्ष श्री. सचिन चाळके यांच्या हस्ते स्वरा चा जाहीर सत्कार करण्यात आला. प्रसंगी मुख्याध्यापक श्री. दशरथ कदम, पदविधर शिक्षक श्री वैभव पवार सहशिक्षक श्री. लक्ष्मण पारवे, मुंढर गावचे पोलीस पाटील श्री नीलेश गमरे,श्री विनायक लांजेकर, श्री. प्रभाकर चव्हाण, सौ. मानसी शिर्के व अनेक पालक उपस्थित होते. सर्वांनी स्वरा ला पुढील परीक्षे साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.