पिकुळे जत्रोत्सव ४ जानेवारी २५ ला

दोडामार्ग | प्रतिनिधि : पिकुळे येथील श्री मुळमाया पुरूचारी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार दिनांक ०४ जानेवारी २०२५ रोजी संपन्न होत आहे.या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री देवीची पुजा अर्चा, अभिषेक होईल,त्यानंतर देवीची ओटी भरणे, नवस बोलणे व फेडणे हे कार्यक्रम होतील, .त्यानंतर रात्रौ जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ आरोस यांचा नाट्य प्रयोग सादर होणार आहे.तरी पाच गावचे मानकरी पिकुळे, उसप खोक्रल बोडदे, झरेबांबर आदींनी उपस्थित राहावे,सर्व ग्रामस्थांनी, पाहुणे मंडळी,मित्र मंडळी व जत्रोत्सव प्रेमी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री रामचंद्र गवस यांनी केले आहे.