खेड मध्ये दारूधंद्यावरील धाडीत ३ हजारांचा ऐवज जप्त

खेड (प्रतिनिधी)खेड नगर परिषद वसाहतीच्या पाठीमागे विनापरवाना सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यावर येथील पोलिसांनी पोलिसांनी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास धाड टाकून ३ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. या

 

प्रकरणी सुशिल गोविंद शिंदे याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो

प्लास्टिकच्या ३५ लिटर मापाच्या कॅनमधून ३० लिटर गावठी हातभट्टीची दारू बाळगत त्याची विक्री करत होता. पोलीस पथकाने धाड टाकून रंगेहाथ पकडले.