कोकण रेल्वे वेळापत्रक अखेर तिसऱ्या दिवशी पूर्वपदावर

खेड (प्रतिनिधी) कोकण मार्गावरील लांजा- आडवलीनजीक ओव्हरहेड वायर तुटून बिघडलेले रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक अखेर तिसऱ्या दिवशी पूर्वपदावर आल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. सोमवारी ५ गाड्यांचा अपवाद वगळता उर्वरित सर्वच रेल्वेगाड्या निर्धारित वेळेत मार्गस्थ झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला: आडवलीनजीक ओव्हरहेड वायर तुटून विस्कळीत झालेल्या वेळापत्रकाने प्रवाशांना सलग दोन दिवस मनस्ताप सहन करावा लागत होता

सोमवारी दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस १ तास ४० मिनिटे, सीएसएमटी-मंगळूर एक्स्प्रेस २ तास ४० मिनिटे, निजामुद्दीन-तिरुवअनंतपूरम राजधानी एक्स्प्रेस १ तास ४० मिनिटे, पुणे- एर्नाकुलम एक्स्प्रेस २ तास १५ मिनिटे, तर तिरूवअनंतपूरम-एलटीटी नेत्रावती एक्स्प्रेस १ तास ३० मिनिटे उशिराने रवाना झाल्या. हा अपवाद वगळता उर्वरित रेल्वेगाड्या नियोजित वेळेत मार्गस्थ झाल्या.