आंब्रड येथील भगवती देवीचा गोंधळउत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता

देवीच्या दर्शनासाठी जनसागर लोटला

आमदार निलेश राणे यांनी घेतले देवीचे दर्शन

स्वप्नील कदम -कुडाळ : आंब्रड येथील भगवती देवीचा वार्षिक गोंधळ उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमासह भाविकांच्या आलोत गर्दीत संपन्न झाला. नवसाला पावणाऱ्या या आई भगवती देवीच्या गोंधळ उत्सवाला र भाविकांनी अलोत गर्दी केली होती.
देवीच्या वार्षिक गोंधळ उत्सवामध्ये सोमवारी पहिला दिवशी सुरवात झाली. यावेळी सर्व देव तरंगाची महावस्त्र, मोहरे सह वाद्य मिवणुकीने मंदिरामध्ये आणली जातात, रात्रौ उशिरा पर्यंत ही महावस्त्र, मोहरे विधिवत देव देवतांना, तरंगाणा परिधान केली गेली. मंगळवारी सकाळी विनापुजन करुन गोंधळ उत्सवाला प्रारंभ झाला. संध्याकाळी देवीला नेवैद्य अर्पण करुन महाप्रसादाला सुरवात झाली रात्री उशिरा पर्यंत महाप्रसाद सुरू होता. ग्रामस्थांच्या चोख नियोजनानुसार भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. सुमारे पंधरा ते वीस हजार भाविक या महोत्सवात सहभागी झाले होते.

 

रात्रौ बारा वाजता दिवट्या प्रज्वलित करून पालखी प्रदक्षणेला प्रारंभ झाला. भगवती देवी च्या मंदिरा मधून सवाद्य पालखी देव रवळनाथ मंदिरा मद्ये गेली व तिथून सर्व देव पंचायतना ला पाच प्रदक्षिणा पुर्ण करण्यात आल्या. प्रदक्षिणा पुर्ण झाल्यावर पालखी पुन्हा देवीच्या सभागृहात विसावली. याठिकाणी गोंधळाचा मांड प्रस्तापित केलेला असतो. भाविक भक्तांनी, सुहासिनी यांनी दिवटी पूजन करून तेल अर्पण करण्यात आले.विविध कलाकरा सह गोंधळ नृत्य, गायन, पौराणिक कथा सादर केल्या गेल्या. पहाटे भवानी चा संचार होतो पुन्हा दिवट्या प्रज्वलित, प्रदक्षणा, आरती ओट्या भरणे, नवस फेडणे, नवस बोलणे आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले.
संपूर्ण कोकण, कोल्हापूर, बेळगाव, कर्नाटक येतून विविध व्यावसायिक दुकाने, मनोरंजना चे खेळ, खाद्य स्टॉल, हॉटेल्सनी सर्व परिसर व्यापलेला होता. श्री भगवती देवी सह सर्व मंदिरे ही फार पुरातन मंदिरे असून सर्व मंदीरे जीर्णोद्धार करण्याचा संकल्प देवस्थानच्या वतीने करण्यात आला आहे.

 

 

भगवती देवीच्या मंदिरासह अन्य मंदिरांना देखील फुलांची सजावट,नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सनई चौघडा, ढोल ताशा, फटाक्यांची आतषबाजी भाविकांचे लक्ष वेधून घेत होते.
नोकरी, व्यवसाय, उद्योगासाठी देशा प्रदेशात गेलेले सर्व आंब्रड वासी, माहेर वासिनी यांची उल्लेखनीय होती. गोंधळ उत्सवा दरम्यान अखंड आम्रड गाव गजबजलेला होता. गोंधळ उत्सवानिमित्त दैनिक प्रहार मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा देवस्थानचे मानकरी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पडला. प्रहारच्या विशेषांकाचे ग्रामस्थांनी व उपस्थित त्यांनी कौतुक केले
यावेळी कुडाळ मालवनचे आमदार निलेश राणे यांनी देवीच्या गोंधळ उत्सवाला उपस्थिती दाखवून देवीचे आशीर्वाद घेतले. यावेळी मोठ्या संख्येने देवस्थानचे मानकरी ग्रामस्थ उपस्थित होते.