मुणगे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न!

मसूरे | झुंजार पेडणेकर : श्री भगवती हायस्कुल मुणगेचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. दरम्यान ते बोलत होते. यावेळी व्यापीठावर संस्था उपाध्यक्ष सुरेश बांदेकर, कार्याध्यक्ष नारायण आडकर, शेठ. म.ग हायस्कूल देवगडचे माजी मुख्याध्यापक संजीव राऊत, संस्था व्यवस्थापक देवदत्त पुजारे, सरपंच सौ अंजली सावंत, पोयरे माजी सरपंच संदीप घाडी, मुख्याध्यापीका एम. बी. कुंज, धर्माजी आडकर, जगन्नाथ परब, महेश कोळंबकर, विष्णू मुणगेकर, वामन आडकर, रवीना मालंडकर, निकिता कांदळगावकर, वसंत शेट्ये ,विजय पडवळ, वसंत गुरव, संतोष लब्दे, मनीषा खानोलकर आदी उपस्थित होते.

यावेळी संजीव राऊत म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थी कुस्ती सारख्या स्पर्धेत यश मिळवत आहे हे कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील शिक्षक विद्यार्थी वर्गाच्या कलागुणांना वाव,उत्तेजन देण्यासाठी विविध उपक्रम राबवतो.अपुरी साधन सामुग्री कमी असली तरीही त्याचं सामग्रीचा वापर करून विद्यार्थ्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविण्यासाठी शिक्षक मेहनत करत असतो.त्यामुळेच शाळेची प्रगती होऊन त्या विद्यार्थ्यांच्या नावे ही शाळा ओळखली जाते.विद्यार्थी मोठे झाले की त्यांच्या नावाने शाळा ओळखली जावी असे कार्य तुमचे हातून होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन यावेळी माजी मुख्याध्यापक संजीव राऊत यांनी केले. मान्यवरानी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. प्रशालेच्या ‘उत्कर्ष ‘ या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.

 

 

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रांगोळी, चित्रकला, हस्तकला, विज्ञान प्रतिकृती याची उद्घाटन करण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण कार्यक्रमाचे उपस्थित मान्यवरांच्या येथे संपन्न झाला. यावेळी प्रणय महाजन, सुनिल बोरकर, एन. जी. वीरकर, प्रसाद बागवे, हरीश महाले, सौ कुमठेकर, सुविधा बोरकर, सुरेश नार्वेकर, एन एल बागवे, स्वप्नील कांदळगावकर, श्री मुणगेकर, संस्थेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे सन्मान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्रीमती कुंज यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक प्रसाद बागवे व शिक्षिका गौरी तवटे यांनी करून उपस्थितांचे आभार सौ तवटे यांनी व्यक्त केले.