बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे विविध ५० शालेय स्पर्धांचा शुभारंभ
मसूरे | झुंजार पेडणेकर : बॅ नाथ पै यांच्या पुण्यातिथी निमित्त
बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे ५० शालेय स्पर्धांचा शुभारंभ
उद्योजिका रोटरीयन रश्मी पाटील यांचे हस्ते करण्यात आला.
या वेळी बोलताना रश्मी पाटील म्हणाल्या, सातत्याने ५० वर्ष स्पर्धा घेणे खूपच कौतुकास्पद आहे अगदी १६ स्पर्धकां पासून सुरू झालेल्या या स्पर्धेला आज २००० पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होत आहेत हे खूपच अभिमानास्पद आहे. गेली अनेक वर्ष माझा सुद्धा यात खारीचा वाटा आहे याचा मला अभिमान वाटतो. असेही त्या म्हणाल्या.
सेवांगणचे विश्वस्त दीपक भोगटे यानी
या स्पर्धांची माहिती दिली. संपूर्ण आठवडा या स्पर्धा सुरू राहणार आहेत. १९७५ साली बॅ. नाथ पै पुण्यतिथी निमित्त या स्पर्धा सुरु झाल्या होत्या. बापूभाई शिरोडकर व श्रीकांत देसाई यांच्या पुढाकाराने या स्पर्धा सुरू झाल्या. प्रारंभी समाजवादी मित्रमंडळाच्या वतीने व नंतर
बॅ नाथ पै वाचनमंदिर व सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने या स्पर्धा सतत ५० वर्ष सुरू आहेत. पहिल्या स्पर्धेतील सहभागी
वंदना करंबेळकर,विकास म्हाडगुत,
जयमाला साळवी, दीपक भोगटेयांच्या विशेष सत्कार करण्यात येणार आहे असेही ते म्हणाले.
या वेळी बापू तळावडेकर, शाम पावसकर, स्पर्धाप्रमुख अर्चना धुत्रे, बाळकृष्ण नांदोसकर, रश्मी पाटील, बाळकृष्ण गोंधळी, डगरे मॅडम,
नेहा जांभवडेकर, दीपक भोगटे, काळसेकर सर, परिसरातील शिक्षक पालक व विद्यार्थी उपस्थित होते.












