महाड येथे दिनांक 18 व 19 रोजी तिसरी सम्यक साहित्य कला संगीती!

संगीतीचे अध्यक्ष प्रा. आनंद देवडेकर तर उद्घाटक म्हणून नाटककार प्रेमानंद गज्वी उपस्थित राहणार!

ज्येष्ठ लेखक ज. वि. पवार, उर्मिला पवार , मिलिंद टिपणीस, डॉ. श्रीधर पवार, रमाकांत जाधव यांची विशेष उपस्थिती! दोन दिवस साहित्यिक – सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी.

चिपळूण (प्रतिनिधी) : अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी या नोंदणीकृत संस्थेच्या वतीने तिसरी सम्यक साहित्य कला संगीती महाड (जिल्हा रायगड ) येथे दिनांक 18 व 19 जानेवारी 2025 रोजी गोपाळ बाबा वलंगकर साहित्यनगरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित करण्यात आली आहे. या संगीतीच्या अध्यक्षस्थानी बौध्द धम्माचे अभ्यासक प्रा. आनंद देवडेकर व उद्घाटक म्हणून नाटककार प्रेमानंद गज्वी उपस्थित राहणार असून त्यांच्या समवेत ज्येष्ठ साहित्यिक ज वि पवार, उर्मिला पवार, डॉ. श्रीधर पवार, रमाकांत जाधव, मिलिंद टिपणीस, रमाकांत जाधव उपस्थित राहणार आहेत.

शनिवार दिनांक 18 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता उद्घाटन सत्र गोपाळ बाबा वलंगकर साहित्य नगरीत, सुरबानाना टिपणीस प्रवेशद्वार, घनश्याम तळवटकर विचार मंच आणि सुभेदार सवादकर सभागृहात होणार आहे. यावेळी बुद्ध वंदना कैलास येलवे, बासरी वादन निर्भय भोसले, संविधान प्रस्ताविका वाचन अशोक चाफे, वंदन गीत शाहीर प्रतीक पवार, प्रस्ताविक संदेश पवार, सूत्रसंचालक निलेश पवार, आभार प्रदर्शन विश्वास पवार करणार आहेत. स्वागत व परिचय रायगड जिल्हाध्यक्ष डॉक्टर संजय खैरे हे करणार आहेत.

यावेळी संगीती अध्यक्ष प्रा. आनंद देवडेकर, उद्घाटक प्रेमानंद गज्वी यांच्यासह ज.वी. पवार, उर्मिला पवार, मिलिंद टिपणीस, डॉ. श्रीधर पवार, रमाकांत जाधव, सुनील हेतकर , दीपक पवार , प्रा. आशालता कांबळे, विश्वास पवार, प्रा. डॉ . राजेंद्र मुंबरकर, संजय गमरे, भावेश लोखंडे, प्रा. विजय मोहिते हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी रायगड जिल्ह्यातील तुळशीराम जाधव गुरुजी, सुभद्राबाई धोत्रे व दीपेशभाऊ जाधव यांचा ज्येष्ठ साहित्यिक ज.वी. पवार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी अपरान्त संगीती 2025 व इतर पुस्तकांचे वाङ्मयाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता भोजन अवकाश राहील.

दुपारी दोन वाजता मोरेश्वर तांबे कला मंचावर विविध कलाविष्काराचे सादरीकरण होणार आहे. त्यामध्ये ‘ मी रमाई बोलतेय ‘ गीतांजली साळवी, काव्याविष्कार निवेदक निलेश पवार, घोटभर पाणी एकांकिकेतील काही अंश सादरीकरण लेखक प्रेमानंद गज्वी, दिग्दर्शक अरुण कदम, महाड क्रांती संगर (नाटक महापुरुष ) मधील काही अंश सादरीकरण मिलिंद कांबळे , दिग्दर्शक रवींद्र खैरे, आंबेडकरी जलसा – राष्ट्रपाल सावंत यांचे सादरीकरण, सखाराम बाईंडर या नाटकातील काही अंश सुरेश जाधव यांचे सादरीकरण , जादूचे प्रयोग जादूगार केशव हाटे यांचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जाधव तर आभार सुबोध सुगंध मोरे करणार आहेत.

सायंकाळी साडेचार वाजता ग. वि. सहस्त्रबुद्धे मंचावर ‘ भारतीय संविधान व बौद्ध धम्म ‘ या विषयावरील परिसंवाद नाटककार अरुण कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. त्यात डॉ. कांता कांबळे व इंजि. अनिल जाधव सहभागी होणार असून नूरखान पठाण सूत्रसंचालन तर धीरज साळवी आभार प्रदर्शन करणार आहोत.

सायंकाळी सहा वाजता शाहीर कुंदन कांबळे काव्य मंचावर कवी जगदीश घनघाव यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडणार आहे. त्यात संध्या तांबे , विवेक मोरे, सरिता पवार, कल्पना मलये , पूनम गायकवाड, स्नेहा कदम, रजनी जाधव, रीना पाटेकर, राकेश शिर्के, संजय खैरे, मारुती सकपाळ, विश्वास पवार, सुनील हे, सिद्धार्थ गोपाळ तांबे ,राजेश कदम, अनिल जाधव, राजेंद्र कदम, अरुण नाईक, विठ्ठल कदम ,विवेक मोरे, प्रा.सुनील बैसाखी, किशोर कासारे, सुरज दाभोलकर, संदेश पवार, राष्ट्रपाल सावंत , संजय गमरे, सुनील जाधव , रवीकुमार जाधव , प्रदीप शेलार, भावेश लोखंडे, प्रथमेश जाधव, अशोक चाफे, अरुण कदम, दीपेश दीपक जाधव सहभागी होणार असून त्याचे सूत्रसंचालन प्रतीक पवार तर आभार प्रदर्शन गीतांजली साळवी करणार आहे.

रात्री नऊ वाजता नवनीत खरे शाहिरी मंचावर शाहीर संमेलन मारुती सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. त्यात दिपाली शिंदे, गीतांजली साळवी, शितल जाधव, हेमलता गावित, जनिकुमार, राष्ट्रपाल सावंत ,राजेंद्र कदम, सिद्धार्थ तांबे, विजय सपकाळ, सोनू जाधव, आनंद जाधव, संतोष गमरे , तुळशीराम जाधव, भगवान जाधव , मारवत जाधव, मिलिंद मोरे, मंगेश जाधव, अशोक अभंगे , जयराम तांबे, जनार्दन काकडे, मारुती शेलार , मंदार कवाडे, प्रदीप तांबे, सुनील इंगळे, सुखदेव बाजड, हिमांशू तूपलोंढे सहभागी होणार असून त्याचे सूत्रसंचालन गंगाधर साळवी तर आभार प्रदर्शन संतोष गमरे करणार आहेत.

रविवारी दिनांक 19 रोजी सकाळी नऊ वाजता बा.स. हाटे मंचावर कथा वाचन – अभिवाचन कार्यक्रम होणार असून त्यात सरिता पवार , सुनील हेतकर , सुधीर जाधव, भावेश लोखंडे सहभागी होणार असून सूत्रसंचालन राजेश कदम तर आभार प्रदर्शन जनार्दन काकडे करणार आहेत.
सकाळी दहा वाजता दादासाहेब संभाजी तुकाराम गायकवाड मंचावर ‘ चवदार तळे संगर : शतकपूर्ती व दीर्घकालीन पडसाद ‘ या विषयावरील परिसंवाद (पेपर वाचन ) डॉ. राजेंद्र मुंबरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे . त्यामध्ये सुबोध मोरे, धम्मकिरण चन्ने व स्नेहा कदम सहभागी होणार असून त्याचे सूत्रसंचालन सुनील गोविंद जाधव तर आभार प्रदर्शन जयराम तांबे करणार आहेत. साडेअकरा वाजता पत्रकार स्वाती लोखंडे, नाटककार रवींद्र खैरे, डॉक्टर संजय खैरे, शाहीर मारुती सकपाळ यांची प्रकट मुलाखत अभिनेते अशोक चाफे घेणार असून आभार प्रदर्शन दीपक जाधव करणार आहेत. दुपारी एक वाजता भोजन अवकाश होणार आहे.

दुपारी दोन वाजता कॉम्रेड आर. बी. मोरे मंचावर ” सांस्कृतिक परिवर्तनात स्त्रियांची भूमिका ” या विषयावरील परिसंवाद प्रा. कनिफ भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून त्यात कल्पना मलये व शालिनी प्रेम आचार्य सहभागी होणार असून त्याचे सूत्रसंचालन भागेश लोखंडे तर आभार प्रदर्शन रजनी जाधव करणार आहे. तर दुपारी साडेतीन वाजता लेखक ज. वि.पवार , उर्मिला पवार, प्रा. आशालता कांबळे , डॉ. श्रीधर पवार यांची प्रकट मुलाखत प्राचार्य सिद्धार्थ तांबे व पत्रकार संदेश पवार घेणार असून आभार प्रदर्शन दीपक पाटील करणार आहेत. दुपारी साडेचार वाजता समारोप करण्यात येणार असून त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गमरे व आभार प्रदर्शन दीपेश भाऊ जाधव करणार आहे. त्यावेळी रायगड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते अरुणा येलवे , रश्मी तांबे, रंजना तळवटकर, निर्मला पाटील, मुकुंद पाटणे गुरुजी, केशव हाटे, संजय सोनवणे, संजय मोरे, श्रीकांत तळवटकर , प्राचार्य दिलीप कासारे, ए.के. जाधव यांचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच संयोजन समिती व जनसंपर्क समिती मधील सर्व सदस्यांचा सन्मान केला जाणार आहे.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने साहित्य, कला प्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रबोधिनीचे सरचिटणीस सुनील हेतकर व संदेश पवार यांनी केले आहे.