विसापूर कातभट्टीवरील कामगाराची प्रकृती बिघडली 

उपचार सुरू असताना रुग्णालयात झाला मृत्यू

दापोली l प्रतिनिधी: अचानक प्रकृती बिघडल्याने विसापूर येथील कातभट्टीवरील कामगाराला दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले ही घटना आज दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी घडली दापोली पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे

याबाबत दापोली पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार निलेश मधुसूदन शिरोडकर राहणार विसापूर पाथरी वाडी यांची विसापूर येथे कातभट्टी आहे या कातभट्टीवर चंद्रकांत गुंडू मसुरकर वय 64 राहणार मळेवाड तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग हे कामाला होते दिनांक 9 जानेवारी रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना दापोली येथील उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले मात्र आज दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मसूरकर मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले या घटनेची खबर निलेश शिरोडकर यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजीत पवार हे करीत आहेत.