रत्नागिरी जिल्हास्तरीय,” रत्न सैनिक संघटनेच्या वतीने माजी सैनिक मेळावा” दिनांक १५ जानेवारी रोजी

मोडकाआगर l वार्ताहर :रत्नागिरी जिल्हास्तरीय रत्न सैनिक संघटनेच्या वतीने माजी सैनिक मेळावा दिनांक १५ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत ग्राम देवालय प्रांगण धामणंद ता.खेड येथे संपन्न होणार आहे. जिल्हास्तरीय रत्न सैनिक संघटना रत्नागिरी यांच्या वतीने या दिवशी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्यामध्ये १) सैनिक कल्याण विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती व कागदपत्रे पुर्तता २) ईसी. एच्. एस्. बाबत मार्गदर्शन ३) सी. एस्. डी. बाबत सविस्तर माहिती.४) सकाळी ९ ते ११ वा.अपरांत हॉस्पीटल, चिपळूण यांच्या निष्णात वैद्यकीय अधिकारी व पथकाकडून माजी सैनिक व परिवारांची मोफत आरोग्य तपासणी ५) सकाळी ९ ते ११ वा.नॅब आय हॉस्पीटल चिपळूण यांचे पथकाद्वारे मोफत नेत्र तपासणी , या माजी सैनिक मेळाव्यासाठी चंद्रकांत सुर्यवंशी (निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रत्नागिरी),कर्नल प्रकाश चव्हाण (अधिकारी इ. सी. एच्. एस्., चिपळूण),शिवाजी जगताप (उपविभागीय अधिकारी, खेड)

सुधीर सोनवणे (तहसिलदार, खेड)

डॉ. श्री. अब्बास झबले (अपरांत हॉस्पीटल, चिपळूण), संतोष नलावडे (नॅब आय हॉस्पीटल, चिपळूण)ऑ. कॅप्टन दिपक पवार (प्रभारी अधिकारी, सी.एस्. डी. चिपळूण) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष सुधीर भोसले, उपाध्यक्ष प्रफुल्ल रेडीज, सचिव गणेश सुर्वे,

कोषाध्यक्ष विलास गमरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी

मनोज पालांडे,वैभव पालांडे,

उमेश पालांडे, नवनाथ शिंदे यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.