वाघिवरे मधलीवाडी येथे १ फेब्रुवारी रोजी माघी श्री गणेश जयंती सोहळा

चिपळूण (वार्ताहर): तालुक्यातील वाघिवरे मधलीवाडी हितवर्धक मंडळ स्थानिक, मुंबई, पुणे आणि महिला मंडळ यांच्या वतीने वार्षिक माघी श्री गणेश जयंती उत्सव शनिवारी १ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे . यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षी वाघीवरे मधलीवाडी येथे माघी गणेशोत्सव अतिशय भक्ती भावाने साजरा करण्यात येतो. यावर्षी होणाऱ्या माघी गणेश उत्सवामध्ये सकाळी ८ वाजता श्री गणेश जन्मोत्सव व पूजन, दुपारी १ वाजता महाआरती, दुपारी १ ते १.३० वाजता महाप्रसाद, दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० वाजता श्री गणेश पालखी मिरवणूक, हभप रिया भुवड व सहकारी दिंडी यात्रा, रात्री ७.३० ते ८.३० हरिपाठ, रात्री ८.३० वाजता महाआरती, रात्री ९ वाजता महाप्रसाद, रात्री ९.३० वाजता प्रमुख अतिथी सन्मान रात्री दहा वाजता काळेश्वरी भजन मंडळ वाघिवरे यांचे सुश्राव्य भजन होईल .
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सरपंच गोपाळ कदम, उपसरपंच फैसल साबळे, पोलीस पाटील अनिल जाधव, चंडिकाई काळकाई काळेश्वरी देवी स्थानिक अध्यक्ष शांताराम भेकरे, कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा चिपळूण ग्रामीणचे अध्यक्ष पत्रकार संतोष भाई कुळे आधी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सिकंदर कदम, सचिव नारायण कदम, खजिनदार दिनेश कदम सर्व पदाधिकारी महिला मंडळ यांनी केले आहे.