गोठणे दोनिवडे नं. २ शाळेच्या कु. पद्मलक्ष्मी गोंडाळ हिची नासा इस्त्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड

 

राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील जि. प. आदर्श शाळा गोठणे दोनिवडे नं. २ (हातणकरवाडी) या शाळेच्या इयत्ता सातवीत शिकणाऱ्या कु. पद्मलक्ष्मी निलेश गोंडाळ या विद्यार्थीनीची नासा इस्त्रो अभ्यास दौऱ्यासाठी जिल्हास्तरावरून निवड झाली आहे.

 

रत्नागिरी जिल्हा परिषद जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्हयातील प्राथमिक शाळांतील मुलांसाठी इस्त्रो नासा भेटीसाठी परिक्षा घेण्यात येते. या परिक्षेत कु. पद्मलक्ष्मी हिने सुयश संपादन केले.
या परीक्षेसाठी तिला मुख्याध्यापक लवू जाधव, उपशिक्षिका सौ. स्नेहा कावतकर, पदवीधर शिक्षिका सौ. सुरेखा सकपाळ, शिक्षण सेवक अजय करळे व आई वडिल यांचे मार्गदर्शन लाभले.
या निवडीबद्दल कु. पद्मलक्ष्मी हिचे गटशिक्षणाधिकारी श्री. भोसले, केंद्रप्रमुख विलास जाधव, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, शिक्षक, पालक यांनी अभिनंदन केले.