विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीने ध्येय गाठण्यासाठीचा प्रवास सुरू ठेवला पाहिजे- दीपक करंजीकर

सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार प्राप्त वितरण सोहळा*

चिपळूण (प्रतिनिधी):–मुलाच्या ताटात काय वाढायचे याची आई जेवढी काळजी घेते. तेवढीच विद्यार्थ्यांच्या बौध्दिक भुकेसाठी काय द्यायचे याची काळजी शिक्षकांनी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनात वाटचाल करत असताना त्यांनी त्यांच्या निवडलेल्या आवडीच्या क्षेत्रात त्यांना मार्गदर्शन म्हणून योग्य माणूस भेटला की त्यांच्या जीवनाची यशाच्या दिशेने जातील. आपण कुठे आहोत आणि काय करण्याची गरज आहे. त्याची क्षमता ओळखून विद्यार्थ्यांनी कशा पध्दतीने पुढे गेले पाहिजे, याचे कोटेकार पालन केले पाहिजे. त्यासाठी नको त्या गोष्टी योग्य वेळेत समजून त्या गोष्टी बाजूला ठेवून विद्यार्थ्यांनी सकारात्मकदृष्टीने ध्येय गाठण्यासाठीचा प्रवास सुरु ठेवला पाहिजे. सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार प्राप्त विद्यार्थी नक्कीच पद्मश्री पुरस्कार घेतील कारण या विद्यार्थ्यांमध्ये क्षमता दिसते आणि ती क्षमता त्यांना चतुरंगमुळे मिळाली असल्याचे प्रतिपादन अभिनेते, लेखक दीपक करंजीकर यांनी केले.

 

शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंदाच्या सभागृहात रविवारी चतुरंग पतिष्ठान यांच्यावतीने ३५ विद्यार्थ्यांना प्राप्त झालेला सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

 

 

यावेळी ते म्हणाले की, पुढे जन्मला येणारी पिढी ही टेक्नोलॉजी कौशल्य आत्मसात करणारी असेल. जगभरातील माहिती ते एका क्लिकवर मिळवतील, असे शिक्षण घेण्यासाठी ही पिढी उत्सुक असेल. यासाठी या पिढीच्या बौध्दिक भुकेसाठीचे शिक्षण देताना शिक्षकांना त्यांच्या कक्षा विस्ताराव्या लागतील, असे मत व्यक्त केले.

 

 

दरम्यान, भागीरथ ग्रामविकास पतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, डॉ. मिलिंद गोखले यांनी देखील विचार मांडले. तसेच पोलीस हेडकॉन्स्टेबल रमा करमरकर याही उपस्थित होत्या.

 

यावेळी हर्षवर्धन सोमनाथ भिंगे (धोंडीरामशेठ दाभोळकर इंग्लिश मिडीयम स्कूल, खेर्डी-चिंचघरी), भूमी नितीन कोलगे (मोरेश्वर आत्माराम आगवेकर मा. विद्यालय, अलोरे), आर्या रामचंद्र नांदिवडेकर (गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालय, सावर्डे), माही प्रथमेश मयेकर (न्यू इंग्लिश स्कूल, तळवली), ओम पुंडलिक नाटेकर (दुर्गाबाई हरी वैद्य मा. विद्यालय, अंजनवेल), साक्षी सुनील कोरे (श्रीमान तुकाराम गणशेठ गांधी विद्यालय, कोंडगाव), श्रेयशा सहदेव नरळे (न्यू इंग्लिश स्कूल, पाटपन्हाळे), श्रेया पवीण पवार (डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल, मंडणगड), यज्ञा संतोष कदम (श्रीधर शीतळे सेकंडरी इंग्लिश मिडीयम स्कूल, मार्गताम्हाने), तन्मय सर्जेराव पाटील (न्यू इंग्लिश स्कूल, लांजा), वेदांग नितीन कुलापकर (पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी), निरजा मुरलीधर पांचाळ (श्रीमान दत्तात्रय कबनुरकर इंग्लिश मिडीयम स्कूल, साखरपा), भक्ती समीर गायकवाड (सद्गुरू काडसिद्धेश्वर विद्यालय, गुणदे), निलांबरी रवींद्रनाथ ठाकूर (श्री. विठ्ठलराव जोशी ाा@रिटीज ट्रस्ट इंग्लिश मिडीयम स्कूल, सावर्डे), आर्या शरदांद्र पुंभार (फाटक हायस्कूल, रत्नागिरी), मानसी नागेश दळवी (श्रीमान चांदुलाल शेठ हायस्कूल, खेड), आर्या वैभव बापट (न्यू इंग्लिश स्कूल, खेर्डी, चिंचघरी), स्वरा मिलिंद विखारे (युनायटेड इंग्लिश स्कूल,चिपळूण), मिहिर पियदर्शन कोपकर (ए. जी. हायस्कूल, दापोली), यज्ञा संदेश परांजपे (कै. सौ. मीनाताई ठाकरे मा. विद्यालय, साडवली), स्वरा मनोहर जोशी (श्रीमती रखुमाई तांडुरंग पालशेतकर मा. विद्यालय, पालशेत), अरजिना अब्दुल सलाम शेठ (न्यू इंग्लिश स्कूल, कसबा), तन्वी अनिल मोरे (चंद्रकांत बाईत मा. विद्यालय, आबलोली), श्रद्धा गणपती निकम (पूज्य साने गाजी विद्यामंदिर, पालगड), यज्ञा वैभव थरवळ (श्रीमती आंधती आण पाध्ये इंग्लिश मिडीयम स्कूल, देवाख), सानवी कौस्तुभ केळकर (बळीराम परकर विद्यालय, मालगुंड), वेदांत वसंत लिंगायत (शिवाजीराम उर्प बाबासाहेब सुर्वे मा. विद्यालय, निवळी), अमर अनंत कोणसी (डॉ. सौ. सारिता नीळकंठ ढेरे मा. विद्यालय, देवखेरकी), भूमी नितीन पवार (श्रीसिद्धीविनायक विद्यामंदिर, मुंढर), निशाद शितलकुमार आकुर्डे (रा. भा. शिर्के प्रशाला, रत्नागिरी), दुर्वा विनायक पडवळ (आर. सी. काळे माध्यमिक विद्यालय, पेढे परशुराम), मयूर राजेंद्र घोरपडे (न्यू इंग्लिश स्कूल, पाग), अपूर्व आनंद बुरटे (एसपीएम, चिपळूण), ऋषिकेश मंदार लेले (सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मिडीयम स्कूल, चिपळूण) या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.