जानवळे येथे ‘शिवसेना चषक २०२५’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

शृंगारतळी (प्रतिनिधी) हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त तालुक्यातील जानवळे बौद्धवाडी येथील क्रिडांगणावर दोन दिवसीय ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेचे युवा नेते सचिन सुरेश कोंडविलकर आणि मित्रपरिवार यांच्या वतीने दि. २२ व २३ जानेवारी रोजी या स्पर्धा संपन्न होणार आहेत.

या स्पर्धेमध्ये एकूण १६ संघानी सहभाग घेतला असून प्रथम विजेता संघास रोख रु. १५,११५ व आकर्षक चषक तसेच उपविजेत्या संघास रोख रु. ११,१११ व आकर्षक चषक, त्याचप्रमाणे मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, प्रत्येक सामना सामनावीर अशा प्रकारची वैयक्तीक बक्षीसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेदरम्यान खेळाडूंसाठी व रसिकांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था केली गेली आहे. सदरची स्पर्धा क्रीडाप्रेमींसाठी यु-ट्यूब च्या माध्यमातून सर्वदूर पोहचविण्याची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे.
गेल्या पाच वर्षापासून सदरची शिवसेना प्रमुख क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सचिन कोंडविलकर व मित्र परिवाराच्या वतीने केले जात आहे. या स्पर्धेचे उद्घाटन दि. २२ जाने. सकाळी ८ वा. तर बक्षीस वितरण २३ जाने. सायं. ४ वा. विविध मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होणार आहे. या भव्य दिव्य स्पर्धेचा आनंद क्रीडाप्रेमींनी घ्यावा असे आवाहन संयोजकांकडून करण्यात येत आहे.