उत्तरायण २०२५ – फ़ूड फेस्टिवल आणि शॉपिंग कार्निवलचे दिमाखात उद्घाटन

रत्नागिरी | प्रतिनिधी : इनर व्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन आयोजित उत्तरायण 2025 फूड फेस्टिवल आणि शॉपिंग कार्निवल चा उद्घाटन सोहळा आज दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सौ. जयश्री गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांच्या हस्ते जयेश मंगल पार्क, थिबा पॅलेस रोड, माळ नाका येथे दिमाखात संपन्न झाला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक सौ जयश्री गायकवाड, लोकमतच्या उपसंपादिका शोभना कांबळे आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील सीनियर प्रोफेसर डॉ. सोनाली कदम आणि प्रख्यात एडवोकेट प्रियाताई लवलेकर उपस्थित होत्या. उद्घाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना क्लबचे अध्यक्ष डॉ. स्वप्ना संदीप करे यांनी क्लबच्या वाटचालीची थोडक्यात माहिती दिली.

उपस्थित पाहुण्यांनी महिलांच्या मेहनतीचे कौतुक करून सर्व स्टॉल धारकांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ रत्नगिरीचे मिडटाउन चे प्रेसिडेंट हिराकांत साळवी, डॉ. संदीप करे, बिपिनचंद्र गांधी, वामन सावंत, राजेंद्र कदम, केदार माणगावकर यांनी मोलाची मदत केली.

तसेच रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी च्या वतीने सीनियर रोटेरियन धरमसी काका, प्रेसिडेंट रुपेश पेडणेकर, निलेश मुळ्ये, श्रीकांत भुरके, मकरंद भुरके, मिलिंद भुरके यांनी शुभेच्छा देऊन गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिया गांधी आणि सोनाली आयरे यांनी केले.

आज २४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत समस्त महिला वर्गासाठी हळदी कुंकू कार्यक्रम देखील आयोजित अर्क्ण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. जयश्री गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना इनर व्हील क्लबला तसेच सर्व स्टॉल धारकांना प्रेरणादायी असे विचार मांडले आणि सर्व महिलांसाठी उद्योजकता आणि स्वावलंबन यांचे महत्त्व सांगितले आणि सर्व स्त्रियांचे कौतुक केले. तसेच समस्त रत्नगिरीकरांना ह्या कार्यक्रमात सहभागी होऊन स्टॉल धारक महिलांना प्रोत्साहित करावे असे आवाहन केले.