हॉटेलमधून मोबाईल लंपास

खेड (प्रतिनिधी) तीनबत्तीनाको येथील एका हॉटेलमधून ५० हजार रूपये किंमतीचे २ मोबाईल चोरल्याप्रकरणी के. रामचंद्र (४२, रा. कर्नाटक) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या बाबत मनोज शिवाजी पाटील यांनी तक्रार नोंदवली. हॉटेलमधून मोबाईल चोरीस गेल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर पोलीस स्थानक गाठले. त्यानुसार संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला.