खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील घाणेखुंट येथील ३२ वर्षीय तरुणाचा मंगळवारी आकस्मिक मृत्यू झाला. सोनू कुमार असे मृत तरुणाचे नाव आहे. तो आजारी असल्याने कंपनीत कामावर गेला नव्हता. खोलीवर झोपून असताना त्याला जास्त प्रमाणात खोकला आला. रिक्षातून नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.