प्रतिनिधी/रोहन कांबळे
कोल्हापूर: राधानगरी तालुक्यातील ठिकपूर्ली येथील सौ.वैशाली सर्जेराव कांबळे (व.व ४०) या महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार ठिकपूर्ली येथील वैशाली सर्जेराव कांबळे या शुक्रवारी नेहमीप्रमाणे गावातील दूधगंगा कालव्यामध्ये कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.कपडे धूत असताना त्यांचा पाय घसरून त्या पाण्यामध्ये पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद पती सर्जेराव कांबळे यांनी राधानगरी पोलिसात दिली आहे. घटनेचा अधिक तपास राधानगरी पोलीस करत आहेत












