
या ऐतिहासिक स्थळाच्या जतन व संवर्धनासाठी पालकमंत्री ना. उदय सामंत यांना दिले निवेदन
ऐतिहासिक स्थळाच्या विकासाठी सर्वोतोपरी सहकार्याची ना. सामंत यांची ग्वाही
राजापूर (प्रतिनिधी): राजापूर आणि कोल्हापूरच्या सीमेवर वसलेल्या येरडव गावाच्या हद्दीत अणुस्कूरा घाटमाथ्यावर असलेले पुरातन पांडवकालीन श्री उगवाई देवो मंदिर आणि ऐतिहासिक शिलालेख नुकताच प्रकाझोतात आला आहे. जीर्णावस्थेत असलेला हा राजापूरातील ऐतिहासिक ठेवा जतन व्हावा, मंदिर संवर्धन व्हावे, त्यासोबता पर्यटनाच्या दृष्टीने या भागा विकास व्हावा, यासाठी आता राजापूर पत्रकार संघाने पुढाकार घेतला असून याबाबत रविवारी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
या ठिकाणी असलेल्या या पुरातन पांडवकालीन श्री उगवाई देवो मंदिर आणि ऐतिहासिक शिलालेखासह या स्थळाचा विकास व्हावा, यासाठी आपण शासनस्तरावरून निधी द्यावा अशी मागणी पत्रकार संघाच्या वतीने ना. सामंत यांच्याकडे केली आहे. पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते यांनी रत्नागिरी येथे ना. सामंत यांची भेट घेऊन हे निवेदन दिले असून याबाबत आपण नक्कीच पाठपुरावा करून हा राजापूर तालुक्यातील पुरातन पांडवकालीन श्री उगवाई देवो मंदिर आणि ऐतिहासिक शिलालेख स्थळाचे जतन, सवंर्धन व विकसित करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करू अशी ग्वाही ना. सामंत यांनी यावेळी दिली आहे.
राजापूर पत्रकार संघाच्या वतीने सर्व पदाधिकारी व पत्रकारांनी नुकतीच या परिसराला भेट देत या ऐतिहासिक मंदिराचे जतन व संवर्धनासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याच संकल्प केला. या मंदिराचे संवर्धन आणि परिसराचे सुशोभिकरण झाल्यास भविष्यात या परिसरात भाविकांसह पर्यटकांही ओढा वाढणार आहे. राजापूरचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी देखील या ऐतिहासिक स्थळाचा विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांया पदस्पर्शाने पुनित झालेल्या राजापूर तालुक्यात अनेक ऐतिहसिक खुणा आहेत. त्यापैका एक येरडव येथील श्री उगवाई देवो मंदीर आहे. फारशी रहदारी नसलेल्या येरडव ते अणुस्कुरा या सुमारे तीन-चार कि. मी. लांबीच्या ऐतिहासिक शिवकालीन पायवाटेवर अणुस्कुरा घाटात राजापूर आणि कोल्हापूराया सीमेवर पुरातन पांडवकालीन श्री उगवाई देवीचे हे मंदीर आहे, आणि या मंदिरालगता मराठी भाषेचा अनमोल ठेवा असलेला आणि शिवकाळातील चौथाई सरदेशमुखीचे अधिकार दिल्याचे निर्देशन करणारा सुमारे दोनशे-अडीचशे वर्षापूर्वीचा ऐतिहासिक शिलालेख व सतत वाहणारा पाण्याचा झरा असा शिवकालीन ऐतिहासिक ठेवा दृष्टीक्षेपात आला आहे.
शिवकाळामध्ये रहदारी असलेली आणि सद्यस्थितीमध्ये बंद होवून दुर्लक्षित राहीलेल्या या पायवाटेने छत्रपती शिवाजी महाराज कोकणामध्ये आल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर, छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी आलेले मोघली सैन्यही या पायवाटेने कोकणात खाली उतरल्याचे सांगितले जाते. या पायवाटेवरील चेक नाकाच्या खाणाखुणा पाहता या पायवाटेने शिवकाळामध्ये वाहतूकही चालण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नंतरच्या काळात मलकापूर, कोल्हापूर येथून कोकणात येण्यासाठी या पायवाटा वापर केला जात असल्योही जाणकार सांगतात.
कालांतराने अणुस्कूरा घाटमार्गाचे काम करताना अन्य पायवाटांप्रमाणे येरडव-अणुस्कूरा ही पायवाटही बंद झाली. अणुस्कुरा घाट वर चढून गेल्यानंतर या मंदिर परिसरात जाण्यासाठी एक रस्ता आहे. हा रस्ता थेट मंदिरापर्यंत जातो. या ठिकाणी असलेले श्री उगवाई देवीचे मंदीर पूर्णपणे जीर्ण झाले असून या मंदीरात श्री शंकराची पिंडी आहे. तसा या ठिकाणी ज्या पायवाटेने शिवकाळामध्ये वाहतूक चालायची तो चेक नाका, अवखळपणे वाहणारा पाण्याचा झरा, एक व्यक्ती आत जाईल एवढी रूंद असलेली गुहा, ढोपरबाव व ऐतिहासिक माहिती देणारा शिलालेख पहायला मिळतो.
तसा अणुस्कूरा घाटाच्या माथ्यावर असलेला हा शिवकालीन ऐतिहासिक ठेवा पाहताना या ठिकाणावरून कोकण परिसर, अर्जुना धरणप्रकल्प अन् निसर्गसौदर्य देखील अनुभवता येते. त्यामुळे भविष्यामध्ये या स्थळा विकास झाल्यास शिवप्रेमी, पर्यटकांसह हौशी ट्रेकर्सची पाऊले या परिसराकडे वळतील. त्या अनुषंगाने या श्री उगवाई देवी मंदिर संवर्धन व्हावे, तसा हा परिसर पर्यटन दृष्ट्या विकसित व्हावा, याकरीता पत्रकार संघाच्या वतीने पुढाकार घेत ना.सामंत यांना निवेदन देण्यात आले आहे. तर यातील काही परिसर हा कोल्हापूर जिल्हयात येत असल्याने संघाच्या वतीने कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनाही याबाबत निवेदन देण्यात येणार आहे. या ऐतिहासिक स्थळाचा विकास झाल्यास राजापूरच्या वैभवात भर पडणार आहे.











