गुहागर | प्रतिनिधी : राज्य सरकारने पोलीस पाटलांचे थकीत मानधन देण्यासाठी ३ ९ कोटी ६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला , तसे पत्रही पोलीस पाटलांच्या संघटनेला ६ जानेवारीला दिले . मात्र , प्रत्यक्षात ही रक्कम पोलीस पाटलांच्या खात्यावर अद्यापही जमा झालेली नाही . नोव्हेंबर व डिसेंबर अशा दोन महिन्यांचे पोलीस पाटलांचे मानधन रखडले गेले आहे . राज्य सरकारने पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ केली मात्र दुसरीकडे मानधन रखडलेले आहे .
राज्य सरकारने पोलीस पाटलांच्या मानधनात एप्रिल २०२४ मध्ये वाढ केली . त्यानंतर ऑक्टोबर महिन्यापर्यंत मानधन देण्यात आले . परंतु नोव्हेंबर २०२४ पासून अद्यापि जिल्ह्यातील पोलीस पाटलांच्या खात्यावर मानधन जमा झालेले नाही . जिल्ह्यात सुमारे पंधराशे महसुली गावे आहेत . तेथे एकूण सुमारे ९ ८० पोलीस पाटील कार्यरत आहेत . गावांच्या तुलनेत पोलीस पाटलांची संख्या कमी आहे . पोलिस पाटील हे शासन , प्रशासन व जनता यामध्ये दुवा म्हणून काम करतात . गावात शांतता व सुव्यवस्था ठेवणे , गावात घडणाऱ्या घटना , घडामोडींची माहिती वेळोवेळी पोलीस व महसूल प्रशासनाला देणे , सामाजिक उपक्रम , उत्सवात प्रशासनाला मदत करतात .
चौकट-
ऑक्टोबरपर्यंत वेळेत यापूर्वी पोलीस पाटलांना ७५०० रुपये मानधन दरमहा दिले जात होते . लोकसभा निवडणुकीपूर्वी शासनाने पोलीस पाटलांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला . एप्रिल २०२४ पासून वाढीव मानधन लागू करण्यात आले . हे वाढीव मानधन ऑक्टोबरपर्यंत नियमित मिळाले . परंतु , त्यानंतर पोलीस पाटलांच्या खात्यावर ते जमा करण्यात आलेले नाही . मानधनासाठी निधी उपलब्ध करण्यात आल्याचे पत्र राज्य राज्य सरकारचे संघटनेला दिले . मात्र त्यानंतरही पोलीस पाटलांच्या खात्यावर मानधनाची रक्कम जमा झालेली नाही .
गावांचा वाढता विस्तार व वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पोलिस पाटलांची रिक्त पदे भरावीत , त्यांना विमा संरक्षण द्यावे , निवृत्तिवेतन लागू करावे , याबरोबरच पोलीस पाटलाना दरमहा नियमित मानधन मिळावे , अशी मागणी आहे . परंतु प्रत्येक वेळी दोन ते तीन महिने मानधन दिरंगाईने मिळत आहे . जिल्ह्यातील गावांच्या तुलनेत पोलिस पाटलांची संख्या कमी आहे .









