मळण मधलीवाडीतील घर कोसळले.. सुदैवाने जीवितहानी नाही 

तात्काळ नुकसान भरपाई मिळावी गुहागर मनसेची मागणी 

गुहागर l प्रतिनिधी :गुहागर तालुक्यातील मळण मधलीवाडी येथील प्रतिभा दिलीप नाटुस्कर यांचे राहते घर दि.२९ जुलै रोजी दुपारी अचानकपणे कोसळले होते. घर कोसळत असल्याचे निदर्शनात येताच या घरात राहणारी माणसे घराबाहेर पडल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. यावेळी फार मोठी गंभीर दुर्घटना झाली असती परंतु दैव बलवत्तर म्हणून घरातील सर्वजण सुखरूप बचावले. नुकसानग्रस्त घराची शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, उप तालुकाध्यक्ष जितेंद्र साळवी यांनी पाहणी केली. नुकसानग्रस्त घराचा पंचनामा करण्यात आला आहे. साधारणतः या घराचे अडीच लाखापर्यंत नुकसान झाले आहे.यावेळी घर मालक प्रतिभा नाटुस्कर यांनी शासनाने या घराची तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मनसेचे पदाधिकारी यांनी रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी ग्रामसेवकांना फोन द्वारे घटनेची माहिती आपण केलेला पंचनामा तलाठी यांनी सादर केला आहे तसेच शासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांनी त्वरित तहसीलदार परीक्षित पाटील यांच्याकडे संपर्क साधत त्वरित कार्यवाही करावी व नुकसान भरपाई तात्काळ द्यावी अशी मागणी केली.गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून भर पावसाळ्यात राहते घर पूर्णपणे उध्वस्त झाल्याने सदरचे कुटुंब चिंताग्रस्त झाले आहे .या घरातील सर्वजण शेजारील वाडीतील एका घरामध्ये राहत आहेत. गणेशोत्सवा अगोदर या नुकसानग्रस्त घरासाठी शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त घरमालक प्रतिभा नाटुस्कर यांनी केली आहे. या घराची पाहणी करतेवेळी गणेश नाटुस्कर, मंगेश धामणस्कर संतोष नाटुस्कर, चंद्रकांत नाटुस्कर, दिनेश नाटुस्कर उपस्थित होते.