राजापूर | प्रतिनिधी : तालुक्यातील तळगाव येथील प्रतिष्ठीत ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते व रास्त धान्य दुकान चालक युसूफशेठ वझीर काझी (६५) यांचे शुक्रवारी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
एक शांत, संयमी व मितभाषी व्यक्तीमत्व अशी त्यांची या परिसरात ओळख होती. कधीही कुणाच्या मदतीला धाऊन जाणारे एक परोपकारी व्यक्तीमत्व म्हणून ते तळगावात ओळखले जात. गेली 30 वर्षे तळगाव गावामध्ये ते रास्त धान्य दुकान चालवत होते. या दुकानाच्या माध्यमातुनही त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला. यूसुफ शेठ म्हणून गावात ते ओळखले जात . तळगावात समस्त हिंदू – मुस्लिम समाजात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
तळगावचे माजी सरपंच महामूद वजीर काझी यांचे लहान भाऊ होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांच्या तळगाव येथील निवासस्थानी धाव घेत काझी कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांच्या आकस्मित निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे.










