खेड (प्रतिनिधी) खेड शहर रोहिदास समाज सेवा संघाच्या वतीने १२ फेब्रुवारी रोजी संत रोहिदास नगर येथे संत रोहिदास महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून यानिमित्त विविधांगी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
सकाळी ८ वाजता संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, ८.३० वाजता महापूजा, १० वाजता महाराजांच्या प्रतिमेची पालखीतून संत रोहिदास नगरमार्गे छत्रपती शिवाजीचौक, वाणीपेठ, बाजारपेठं, सिद्धीविनायक मंदिर, खांबतळेमार्गे पुन्हा कार्यक्रमस्थळी दाखल होवून मिरवणुकीची सांगता होईल. दुपारी १ वाजता समाजातील महिलांचे हळदीकुंकू समारंभ, २ वाजता महाप्रसाद, ३ वाजता भाविकांसाठी मंडपात पालखी दर्शनाठी ठेवण्यात येणार आहे.
सायंकाळी ७ वाजता महिला व पुरूष गटात संगीत खुर्ची स्पर्धा, रात्री ८ वाजता लहानगटासाठी नृत्य स्पर्धा, ९ वाजता मुंबई येथील कवी बाळाराम शिरीषकर यांचे संत रोहिदास महाराजांच्या जीवनावर आधारित प्रवचन होणार आहे











