हत्ती हटाव मोहिम आंदोलन स्थगित!!

सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांची माहिती 

दोडामार्ग:सुहास देसाई :खानापूरच्या धर्तीवर तिलारीत हत्ती पकड मोहिम राबवा या मागणीसाठी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य १० तारीखपासून साखळी उपोषण छेडणार होते मात्र रविवारी सकाळी झालेल्या विशेष बैठकीत आंदोलन तात्पूरते स्थगित करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने हत्ती पकड मोहीमेबाबत कधी नव्हे ती सकारात्मक भूमिका घेतली आणि पालकमंत्री, स्थानिक आमदार यांनीही दिलासादायक भूमिका जाहीर केली यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी सांगितले.

 

साटेली भेडशी येथे ही बैठक संपन्न झाली. यावेळी तालुक्यातील सरपंच मोठया संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने केलेल्या पत्रव्यवहाराचे निर्धारीत वेळेत पालन करून हत्ती पकड मोहिमेबाबत केलेल्या उपाययोजना संघटनेस कळवावे अन्यथा पुनः आंदोलन उभे राहील्यास वनविभाग जबाबदार राहिल असे सांगण्यात आले तसेच मुंबई येथे वनमंत्री यांच्यासोबत होणार्यां बैठकीस सरपंच, शेतकरी प्रतिनिधी जातील हेही ठरविण्यात आले