‘त्या’ अज्ञात ट्रॅक्टर चालकाच्या शोधात पोलीस

खेड (प्रतिनिधी) खेड-दापोली मार्गावरील नारिंगीनजीक ट्रॅक्टर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील अमोल बाबू चव्हाण (२५) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रॅक्टरचालक घटनास्थळावरून पसार झाला. येथील पोलिसांकडून अज्ञात ट्रॅक्टर चालकाचा शोध घेण्यात येत आहे.

अज्ञात ट्रॅक्टर चालकाबाबत अद्याप ठोस माहिती पोलिसांना प्राप्त झालेली नाही. यामुळे ट्रॅक्टरचालकाचा शोध घेण्याचे आव्हानं येथील पोलिसांसमोर आहे.