सामाजिक कार्यकर्ते यशवंत जोशी यांचे निधन

सावंतवाडी : मळगांव ब्राम्हणपाट येथील सामाजिक कार्यकर्ते यशवंत कृष्णा जोशी (८५, रा. मळगांव जोशी – मांजरेकरवाडी ) यांचे गुरुवारी मध्यरात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते एक उत्कृष्ट चित्रकार होते. मळगांव केंद्र शाळेच्या जिणोद्धारामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग राहिला होता. मितभाषी असले तरीही हसतमुख असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मूलगा, दोन विवाहित मूली, जावई, नांतवडे असा परिवार आहे.