खेड (प्रतिनिधी)—
श्री स्वामी समर्थ मठ कशेडी येथे गुरूपौर्णिमा उत्सव सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाचा लाभ खेड पोलादपूर दापोली मंडणगड महाड माणगाव चिपळूण व अखंड कोकण प्रांतातुन असंख्य स्वामीभक्तांनी घेतला यावेळी नियोजनाप्रमाणे सर्व कार्यक्रम स्वामी कृपेने निव्रिघ्नपणे पार पडला गुरूपौर्णिमेनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान मठाच्या वतीने आयोजित करण्यात आला त्याचप्रमाणे खेड एसटी आगाराचे आगारप्रमुख सन्मा श्री रणजीतजी शिर्के साहेब यांचा देखील यथोचित सन्मान करण्यात आला आगारप्रमुख शिर्केसाहेब यांनी भक्त गणांची गैरसोय ओळखून खेड येथून कशेडी बंगला अशी गुरूपौर्णिमेनिमित्त एसटी बससेवा उपलब्ध करून दिली याबद्दल भक्तगणांनी आगारप्रमुख साहेबांचे आभार मानले सर्व उपस्थित भक्तगणांनी स्वामी महाप्रसादाचा लाभ घेतला या सोहळ्याला उपस्थित स्वामी भक्तांचे संस्थेच्या वतीने स्वागत व आभार मानले गेले
या सर्व कार्यक्रमामध्ये मठातील श्री स्वामी सेवेकरी मंडळीनी स्वताला स्वामी सेवेत झोकून देऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला













