DODAMARG: तब्बल 45 वर्षानंतर पिकुळेत माजी विद्यार्थीचे गेट टुगेदर

Alumni get together in Pikule after almost 45 years

सन 1978/79 दहावी

दोडामार्ग: सुहास देसाई ; धी बांदा नवभारत प्रसारक मंडळ मुबई संचलित श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे या प्रशाळेतील सन १९७८-७९बॅचचा स्नेहमेळावा ४५ वर्षांनी शाळेत नुकताच संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर तत्कालीन असणारे मुख्याध्यापक श्री धो.शं.पणशीकर हे अध्यक्षस्थानी होते. त्यावेळी असणारे शिक्षक श्री एस्.टी.गवस, पिकुळे श्री पी.एम्.पार्सेकर, बांदा सध्याच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ स्नेहल गवस, निवृत्त शिपाई श्रीमती लक्ष्मी जाधव आदीं उपस्थित होत्या तर २७पैकी त्यावेळी विद्यार्थी असलेल्या पैकी २२ जणांनी स्नेहमेळाव्याचा आनंद घेतला.काहीजण आपल्या कुटुंबासमवेत आले होते.

या माजी विद्यार्थी पैकी काही जण साठीच्या उंबरठ्यावर होते तर बरेच जण साठी पार केलेले होतें.असे असताना सुद्धा आपण सर्व जण जवळ जवळ ४४-४५ वर्षांनी एकत्र आले हे पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर अगदी आनंद ओसंडून वाहत असताना दिसत होता.सुरूवातीला सर्व पाहूणे आणि शिक्षकांना सुहासिनीनी औक्षण करून सभागृहात स्वागत केले.आपल्या अध्यक्षिय भाषणात वयाच्या ८७ व्या वर्षी सुद्धा सन्माननीय श्री पणशीकर सरांनी आपण केवळ तुम्हाला ४५ वर्षांनी केवळ भेटायला आलो, सर्वांना भेटून व सर्वांशी बोलून निश्चितच यापुढेही आपण सर्वजण निरोगी आयुष्य जगु. आपण ८७ व्या वर्षी सुद्धा कसे निरोगी आहे ते पण त्यांनी आपल्या भाषणात नमुद करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच सन्माननीय श्री एस्.टी.गवस, श्री पार्सेकर सर,सौ.गवस, श्रीमती लक्ष्मी जाधव यांनी सुद्धा आपल्या भाषणातून समाधान व्यक्त केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांपैकी सदाशिव गवस, विठ्ठल गवस, पायाजी गवस, गणपत परमेकर, सत्यवान गवस, श्रीधर जाधव, पांडुरंग सावंत, शंकर सावंत यांनी सुद्धा आप आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.तसेच सपत्नीक आलेल्या विद्यार्थ्यांच्या काही सौभाग्यवती यांनी सुद्धा आप आपल्या आठवणी कथन केल्या.कार्यक्रमात सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पाहुणे यांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह, बुके देऊन सन्मान करण्यात आला. प्रत्येक विद्यार्थ्याला आठवण म्हणून सन्मान चिन्ह देण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेला एक कपाट भेट देण्यात आले तर श्रीधर जाधव यांनी शाळेला भारतीय संविधान फोटो आणि एक पुस्तक भेट म्हणून दिली. कार्यक्रमाचे सुत्र संचलन श्री सदाशिव अनंत गवस, प्रास्ताविक श्री सत्यवान विष्णू गवस आणि आभार श्री विठ्ठल कृष्णा गवस यांनी मानले. शेवटी केक कापून झाल्यावर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.